
दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । सातारा । खटाव गावाच्या हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करताना चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री जेरबंद केले . या प्रकरणी पोलिसांनी एक जेसीबी दोन वाळू ट्रॉली व पाच ब्रास वाळू उपसा 26 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला .
पोलीस अधीक्षकअजय कुमार , अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांनी अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांना सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री . धुमाळ यांनी पोलीस उप निरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून जिल्हयात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या .
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ पोलीस यांना शुक्रवारी उशिरा रोजी यांना त्यांचे खास बातमीदारांकडून बातमी मिळाली की पुसेगांव पोलीस ठाणे हद्दीत खटाव गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन चालु आहे . त्या अनुषंगाने पो.उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांचे पथकास बातमीचा आशय सांगून अवैध वाळू उपसा करणाऱ्या इसमांनावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सुचना दिल्या . सदर अनुषंगाने दिनांक 25 रोजी पहाटे 2.45 वा . चे सुमारास खटाव ता.खटाव जि . सातारा गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथे येरळा नदीचे पात्रात अचानक पोलीस पथकाने छापा टाकला त्यावेळी काही इसम जेसीबी , ट्रॅक्टर च्या साहयाने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करीत होते , सदर ठिकाणी अंदाजे ५ ब्रास वाळू चा डेपो तयार केला असलेचे निदर्शनास आले सदर बाळु डेपोवरती महसुल विभागामार्फत कारवाई करणे तजवीज ठेवली व त्यावेळी सदर इसमानां नमुद जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली सह ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे येथे हजर केले . सदर बाबत पुसेगांव पोलीस ठाण्यास गुरनं . २१८ / २०२ ९ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून ४ इसमांना ताब्यात घेवून एक जेसीबी , व वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण रूपये २६,१४,००० / – ( रूपये सव्हीस लाख चौदा हजार ) इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
या कारवाईत सहाय्यक फौजदार तानाजी माने , पोहवा संतोष पवार , लक्ष्मण जगधने , साबीर मुल्ला , नितीन गोगावले , मंगेश महाडीक , पो.ना. अमोल माने , अमित सपकाळ , अर्जून शिरतोडे , स्वप्नील माने , शिवाजी भिसे , गणेश कापरे , पो.कॉ. स्वप्नील दौंड , प्रविण पवार , मोहसिन मोमीन , मयुर देशमुख व पुसेगांव पोलीस ठाणे कडील म.पो.हवा . पाटील व चालक पो.कॉ. डोंबे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला सदरचे चांगले कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक श्री . अजय कुमार बंसल , अपर पोलीस अधीक्षक , श्री अजित बोऱ्हाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे .