
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । सातारा । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडाळा तालुक्यात जावून रेकॉर्डवरील दोन सराईत चोरट्यांना जेरबंद करत चार घरफोड्यांचा छडा लावला. अकेला थिमथिम्या भोसले आणि उमेश उर्फ उम्या इंजेश पवार दोन्ही रा. खंडाळा, ता. खंडाळा, अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, जिल्ह्यातील उघडकीस न आलेले जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोनि किशोर धुमाळ यांनी सपोनि रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांचे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले आहे.
या पथकाला 08 जुलै रोजी खंडाळा परिसरामध्ये राहणार्या सराईत गुन्हेगारांनी खंडाळा व वाई तालुक्यात घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत अशी माहिती प्राप्त झाली. यानंतर पथकाने खंडाळा परिसरामध्ये जावून इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे कसून चौकशी केली असता चार घरफोड्यांचा छडा लागला. सराईत चोरट्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे 2, वाई पोलीस स्टेशनच्या हददीत घरफोडीचा 1 तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या हददीत घरफोडीचे 1 असे एकुण 4 गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरट्यांना पुढील कार्यवाही कामी खंडाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहा. फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पो.हवा.कांतीलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, पो. ना. शरद बेबले, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, रवि वाघमारे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, राजकुमार ननावरे, पो.कॉ.केतन शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, विक्रम पिसाळ, प्रविण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.