स्थैर्य, सातारा, दि.१३: शिरवळ, ता. खंडाळा येथील लॉकिम फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टे विकण्यास आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, 6 जीवंत काडतुस व इतर साहित्य असा एकुण 76 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, शिरवळच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील लॉकिम फाट्याजवळ दोन इसम पिस्टल विक्री करण्याकरीता येणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लॉकीम फाटा, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा येथे जावून सापळा लावला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम पुणे बाजूकडून लॉकीम फाटा येथे आले. पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंग़झडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, 6 जीवंत काडतूस, दोन मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 76 हजार 200 रुपये किमतीचा मुददेमाल मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करुन त्यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, विक्रम पिसाळ, केतन शिंदे, संजय जाधव, विजय सावंत यांनी केली.