महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण तालुका खंडकरी शेतकरी संघटनेचे नेते श्री. लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये सर्वात दीर्घकाळ लढला गेलेला खंडकरी शेतकर्‍यांचा लढा हा महाराष्ट्राला माहीत आहे. १९६२ पासून खंड वाडीचे आंदोलन हे जमीन मिळवण्यासाठी सुरू झाले, तेव्हापासून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये ही संघटना खंडकरी – शेतकरी नावाने कार्यरत आहे. अनेक वर्षाच्या या प्रदीर्घ लढ्याची महाराष्ट्राला ओळख आहे व याच संघटनेच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांची निवड करताना या संपूर्ण १३ मळे व ६ जिल्ह्यातील खंडकरी शेतकर्‍यांनी त्यांच्या ४२ वर्षाच्या कार्याची व संघर्षाची दखल घेतली आहे.

या निवडीबद्दल नाईक निंबाळकर यांचे फलटण तालुका खंडकरी – शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!