राम मंदिर पायाभरणी विरोधात लक्ष्मण माने यांचे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा, दि. ०४ : आज होत असलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या पाया भरणीच्या निषेधार्थ सातारा येथे भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी त्यांच्या घरासमोर त्यांचे कार्यकर्ते मच्छिन्द्र जाधव, पी.डी. साबळे यांच्यासह तोंडाला काळ्या बांधून, काळे झेंडे लावून आंदोलन सुरू केले आहे.

माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे 5 ऑगस्टला अयोध्येत जाऊन राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. आर.एस.एस.किंवा बिजेपीचे नाहीत. हा राष्ट्रद्रोह आहे. देशाचा इतिहास उलटा करणारे कृत्य आहे. ज्या जागेवर राम जन्माचा कोणताही पुरावा नाही.रामाच्या मृत्यूचा पुरावा नाही, रामाचे राज्य होते असा पुरावा नाही, याउलट अयोध्या ही सम्राट अशोक यांची साकेत नगरी आहे.सपाटीकरणात बुद्ध मूर्ती, बौद्धांचे स्तूप,बौद्ध चिन्ह, अशोक चक्र अशा बौद्ध कालीन वस्तू सापडल्या.त्या जागेवर आमचा राम मंदिर बांधण्यास आमचा विरोध आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी मी व माझे सहकारी काळ्या फिती लावून तोंडाला काळे तोंडाला काळे रुमाल बांधून काळा झेंडा लावून निषेध करत आहोत. आम्हा ब्राह्मणेत्तराना रामराज्य नको आहे. रामराज्यात फक्त ब्राम्हण वर्णाचे हित आहे. ज्ञान त्यांनाच प्राप्त होते. आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हवे. पुन्हा वर्ण व्यवस्था नको, समतेवर आधारित डॉ.बाबासाहेबांची घटनाच आम्हाला माणूस बनवेल.आम्हाला रामराज्य नको ज्यांना हवे त्यांनी सोन्याचे मंदिर बांधावे, असे म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!