लक्ष्मण लिपारे व गणपतराव लिपारे यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. १५: रविवार पेठ येथील परिवार साडी सेंटरचे मालक लक्ष्मण गणपतराव लिपारे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तासाभराच्या अवधीतच त्यांचे वडील कोष्टी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक गणपतराव नामदेवराव लिपारे (वय ९३) यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले.

गणपतराव लिपारे हे श्री देवांग कोष्टी समाज ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच सल्लागार समितीत सदस्य म्हणूनही कार्यरत होते. फलटण येथे चौंडेश्वरी देवी मंदीर उभारणीत महत्वपुर्ण योगदान होते. कोष्टी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये ते अग्रभागी असत. एकाच दिवशी मुलगा व वडिल यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!