
स्थैर्य, कातर खटाव, दि. ०९ : येथील जेष्ठ नागरीक लक्ष्मण पांडुरंग खुस्पे (वय ७७) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. ते मांजगांव डॉकचे निवृत्त कर्मचारी असून लढाऊ बोटी बनविण्याचे कामकाजामध्ये त्यांचा सहभाग होता. ते येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व जी.ए.आय.टी. कॉम्प्युटर्सचे संचालक अजय खुस्पे, पुणे येथील स्मार्टलिव्हन प्रा. लि. कंपनीचे सी.ई.ओ. विजयराव खुस्पे यांचे वडील होत