लाँच झाला सेल्फ सॅनिटायझिंग मास्क; 95 टक्क्यांपर्यंत विषाणूंना मारण्यास सक्षम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: देशात अजुनही कोरोनाचा संसर्ग होत आहे. अद्याप कोरोनावर
कोणतंही औषध किंवा लस सर्वसामान्यांपर्यंत आली नसल्यानं यावर मास्क आणि
सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. देशातील काही राज्यांमध्ये मास्क
लावणं बंधनकारक असून काही कंपन्यांनी मास्क लाँच केले आहेत. यात आता
Breathe Easy या कंपनीनेही स्पेशल मास्क लाँच केला आहे. 

KARBON असं नाव असलेला हा फेस मास्क 95 टक्के व्हायरसला निष्क्रिय करतो असा
दावा कंपनीने केला आहे. फक्त काळ्या रंगात उपलब्ध असलेला हा मास्क नेल्सन
लॅबने मान्यता दिलेला आहे. या मास्कमध्ये तीन लेअर देण्यात आल्या आहेत.
यातील बाहेरील लेअर फॅब्रिक लेअर असून यात बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून
एअरबॉर्न कंटेट ब्लॉक केला जातो. तसंच डबल नाइट लेअर हवेतील कणांना रोखते.
तर तिसऱ्या बायोफॅब्रिक लेअरमध्ये अँटि मायक्रोबिअल्स असून यात व्हायरस आणि
बॅक्टेरियाला मारण्याची ताकद असते. 

कंपनीचे म्हणणे आहे की, मास्कची आतली लेअर सॉफ्ट आहे त्यामुळे जास्त काळ
मास्क घालणं त्रासदायक नसेल. त्यासोबतच आतली लेअर सेल्फ सॅनिटायझिंग असून
हाय क्वालिटी यॉर्न कापडापासून तयार करण्यात आला आहे. KARBON मास्कची किंमत
799 रुपये इतकी आहे.

याआधी Xiaomi कंपनीने फेस मास्क लाँच केला आहे. कंपनीने म्हटलं होतं की, हा
मास्क घालणं आरामदायी असून वापरणाऱ्यांना नक्कीच आवडेल. मास्कच्या सपोर्ट
फ्रेमचा शेप बदलता येऊ शकतो. फेस मास्क चेहऱ्यावर फिट बसतो त्यामुळे एअर
टाइटनेस आणखी चांगली होते असंही सांगितलं होतं. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!