येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करताना सरपंच सौ. वैशाली लालासाहेब माने(पाटिल) समवेत इतर मान्यवर.( छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. ०९ : वरुड (ता. खटाव) येथील महिला सरपंच सौ. वैशाली लालासाहेब माने-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
सौ. माने-पाटील यांना सरपंच पदावर आठ ते नऊ महिने संधी मिळाली. या कालावधीत त्या व त्यांचे पती लालासाहेब माने-पाटील यांनी 14 वा वित्त आयोग व इतर निधीतून सुमारे 20 लाखांची विकासकामे मंजू करुन आणली. यामध्ये तानाजीनगर (साळुंखे वस्ती) रस्ता क्रांक्रीटीकरण, शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा शौचालय व स्वच्छतागृह बांधकाम, पाथरुबाई विहीर दुरुस्ती, मानेवस्ती स्मशानभूमी वेटींग शेड, मानेवस्ती पेवर ब्लॉक रस्ता आदी कामांचा समावेश आहे. कोरोना प्रार्दुभाव रोखण्याच्या अनूशंगाने सोशल डिस्टन्स राखून या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर, उपसरपंच दत्तात्रय काटकर, मानवाधिकार संघटनेचे सोमनाथ साठे, तानाजी जगदाळे, पुरुषोत्तम इनामदार, रघुनाथ मोहिते(सर),धनाजी बहिरट, भरत चौगूले, सुरेश साळुंखे शेठ, संतोष साळूंखे, मोहन माळी, आप्पा फडतरे, नवनाथ माने, संतोष माने, अशोक माने, साहेबराव माने, भालगुराम(अर्जुन)माने ,मारुती माने, संपत माने, सुरेश सुर्यवंशी, सदाशिव माने, अक्षय फडतरे, मनोज चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, ठेकेदार नवनाथ साठे आदी ग्रामस्त उपस्थित होते.