दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । मुंबई । जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त होमिओपॅथीच्या गुणांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नासह डॉ. मुकेश बत्रा यांनी आज त्यांचे नाटक ‘जीना इसी का नाम है’चा शुभारंभ केला. या नाटकाच्या प्रयोग सोफिया भाभा ऑडीटोरियम, मुंबई येथे रंगला.
‘जीना इसी का नाम है’ डॉ. बत्रा यांचे आत्मचरित्र ‘द नेशन्स होमिआपॅथ’चे नाट्यरूपांतरण आहे आणि या नाटकाने एका जिवंत व्यक्तीच्या जीवनाला दाखवणारे पहिले नाट्यप्रदर्शन म्हणून इतिहास रचला आहे. रंगभूमीमधील दिग्गज ओम कटारे यांचा रंगभूमी समूह ‘यात्री थिएटर’चे लक्षवेधक परफॉर्मन्स असलेल्या या नाटकामध्ये डॉ. मुकेश बत्रा यांचे वास्तविक जीवनातील भावनिक अनुभव, उद्योजक दूरदर्शी व प्रख्यात होमिआपॅथ बनण्याच्या प्रवासामध्ये आलेले अपयश व आव्हानांना पाहायला मिळते.
डॉ. बत्रा यांची महान कलाकृती पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांमध्ये रंगभूमी व अभिनय क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती देखील होते, जसे गुलशन ग्रोव्हर, भरत दाभोळकर, राकेश बेदी, मधू, मिकी मेहता व राईल पदमसी, जे प्रबळ अभिनय व कथानकाकडे प्रभावित झाले.
या नाटकाबाबत बोलताना गुलशन ग्रोव्हर म्हणाले, “होमिओपॅथीचा दीर्घकाळापासून रूग्ण आणि डॉ. मुकेश बत्रा यांचा चाहता म्हणून त्यांचा जीवनप्रवास आणि भारतातील होमिओपॅथीचा प्रवास पाहण्याचा अनुभव अद्भुत आहे. हे नाटक सर्वोत्तम आहे आणि यासारख्या प्रबळ कथानकासह मी या नाटकाचे लवकरच चित्रपट रूपांतरण पाहण्याची आशा करतो.”
प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आनंदित झालेले डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “मी माझा जीवनप्रवास पाहण्यासाठी वेळात वेळ काढून आलेल्या प्रेक्षकांचे, तसेच नाटकाचे कौतुक करण्यासोबत प्रोत्साहन देणा-या सर्वांचे आभार मानतो. मी ऋणी आहे की, माझ्या जीवनातील अनुभव उदयोन्मुख उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात आणि आशा करतो की, यामुळे त्यांना त्यांच्या स्वत:च्या जीवनप्रवासामध्ये मदत होईल.”
उपस्थित शुभचितंकांव्यतिरिक्त डॉ. बत्रा यांनी हे नाटक पाहण्यासाठी राज्यभरातील होमिओपॅथी महाविद्यालयांमधील विद्यार्थी व शिक्षकांना देखील आमंत्रित केले. या नाटकाचे रेकॉर्डेड व्हर्जन देशभरातील व्यवस्थापन संस्था, होमिओपॅथी महाविद्यालये व लायब्ररींना दान करण्यात येईल, ज्यामुळे उदयोन्मुख होमिओपॅथ्स व भावी व्यवसाय लीडर्सना आशा व उद्योजकतेचे धडे मिळतील. आशा व प्रेरणेच्या संदेशासह हे नाटक भारतातील विविध शहरांमध्ये तिकिट विक्री करण्याच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. या तिकिट विक्रीमधून प्राप्त झालेले उत्पन्न वर्षभर समाजातील गरीब व वंचित सदस्यांच्या मोफत होमिओपॅथी उपचारासाठी दान करण्यात येईल.