डॉ .अभिराम पेंढारकर यांच्या श्रीराम नर्सिंग होम मध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
स्थैर्य, सातारा, दि. १८ : मेक इन इंडिया या प्रकल्पा अंतर्गत पुणे येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड च्या वतीने तयार करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयात प्रथमच बसले जाणारे क्लाऊड टेस्टिंग मशीन चा शुभारंभ बुधवार दि.19 ऑगस्ट 2020 रोजी सातारा येथे होत आहे .सातारा येथील सोमवार पेठेतील डॉ .अभिराम पेंढारकर यांच्या श्रीराम नर्सिंग होम मध्ये या तपासणी यंत्रणेचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा ,जावली तालुक्याचे आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश चव्हाण, जिल्हा पोलिस उपप्रमुख समीर शेख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
क्लाऊड तपासणी मशीन बाबत अधिक माहिती देताना डॉ. पेंढारकर म्हणाले की मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या प्रकल्प खाली हिंदुस्थान अँटिबायोटिक्स च्या कडून निर्माण झालेले हे मशीन रुग्णासाठी वरदान ठरणारे आहे .केवळ तीन मिनिटात एकावेळी तपासणी करण्यात येणाऱ्या रुग्णाचा रिपोर्ट हे मशीन देते गरजू रुग्णांसाठी आवश्यक असणारे हे रिपोर्ट अतिशय कमी खर्चात देण्याची सुविधा या ठिकाणी करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात खासगी रुग्णालयात हे मशीन प्रथमच सुरू होत आहे, याचा विशेष आनंद होत असून या आरोग्यसेवेचा सर्व जिल्हा वासियांनी तसेच लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.