
दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । फलटण । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणार्या गरजू, होतकरु विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीमंत विश्वजीतराजे शिष्यवृत्ती योजने’चा शुभारंभ करण्यात आला . राजे गटाचे युवा कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर व फडतरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल फडतरे, अजिंक्य उर्फ बंटी गायकवाड, राकेश तेली यांच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे.
सदर योजनेबाबत माहिती देताना प्रितसिंह खानविलकर व अमोल फडतरे यांनी सांगितले की, अमोल बुक हाऊस व जिजाऊ अभ्यासिकेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने ना.श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ त्यांच्याच हस्ते करण्यात येणार असून फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत पोलीस / आर्मी भरतीच्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ना नफा ना तोटा तत्त्वावर पुस्तक वाटप केले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्याने इ.12 वी परीक्षेमध्ये 80% किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेले असावेत. तरी या अटी पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, इ.12 वी चे गुणपत्रक व पासपोर्ट साईज फोटोसह अमोल बुक हाऊस स्पर्धा परिक्षा पुस्तक केंद्र, गजानन चौक, अॅक्सीस बँकेच्या पाठीमागे, फलटण येथे संपर्क साधावा अथवा अधिक माहितीसाठी प्रितसिंह खानविलकर (895693999), अमोल फडतरे (7588060951), बंटी गायकवाड (9922778586), राकेश तेली (9096421431) या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.