दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये कौशल्यप्राप्तीच्या बाबतीत राहून गेलेली दरी भरून काढण्यासाठी नेक्स्ट एज्युकेशन या सास आधारित, तंत्रज्ञानावर चालणा-या व भारताच्या के-१२ क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणा-या कंपनीने नेक्स्ट ३६० या आपल्या प्रमुख कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. हा एक सर्वंकष शैक्षणिक कार्यक्रम आहे, जो विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकाला साजेशी कौशल्ये विकसित करेल व या कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणेल.
शिक्षणाला एक जीवनपद्धती म्हणून स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याच्या आणि त्यांना अनिश्चित भविष्यासाठी तयार करण्याच्या कंपनीच्या ध्येयाशी नेक्स्ट ३६० चे लक्ष्य मिळतेजुळते आहे. हा आगळावेगळा शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्थांना बहुविध फायदे मिळवून देतो. परिणामकारक दृक्श्राव्य सादरीकरणे, विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे उपक्रम, सिम्युलेशन्स, पाठांचे नियोजन, पुस्तके आणि मूल्यमापन यांना सहजतेने एकत्र आणणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतानाच हा कार्यक्रम शिक्षकांनाही एक सुघड आणि तपशीलवार कृतीआराखडा बनवून देतो. सर्वंकष अध्यापन-अध्ययन दृष्टिकोनासह रचण्यात आलेला आणि विकसित करण्यात आलेला हा कार्यक्रम कौशल्याधारित अध्ययनपद्धती देऊ करतो व हे करताना भाषाविकासावर भर देतो.
नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बियास देव राल्हान म्हणाले, “विद्यार्थ्यांची सध्याची पिढी कोव्हिड-१९च्या सामाजिक-आर्थिक परिणामांमुळे असमान पद्धतीने प्रभावित झाली आहे. भारतीय शाळा आता एका अशा वळणावर उभी आहे, जिथून एकच योग्य मार्ग निवडणे आवश्यक आहे आणि आता त्यासाठी दूरगामी परिणाम करू शकेल अशा दर्जात्मक व विकासाच्या दिशेने जाणा-या शिक्षणपद्धतीचा मार्ग जाणीवपूर्वक निवडण्याची वेळ झाली आहे. नेक्स्ट ३६० ही आमची उपाययोजना नेमकी हीच गोष्ट पुरवते. हा एक अत्यंत नेमका, ऑल-इन-वन परवडण्याजोगा आणि सर्वसमावेशक शैक्षणिक कार्यक्रम आहे ज्याची रचनाच मुळी २१व्या शतकाला साजेसे शिक्षण प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.”
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना एक अकॅडमिक किट आणि अद्ययावत शैक्षणिक संसाधने पुरवली जातील. नेक्स्ट ओएसचे पाठबळ लाभलेली ही ऑप्टिमम प्लॅटफॉर्म उपाययोजना पुरस्कार-विजेत्या कन्टेन्टने, अडॅप्टिव्ह असेसमेंट पद्धतीने सुसज्ज आहे. याखेरीज त्यांना एक संपूर्ण सॉफ्टवेअर स्टॅक, सेल्फ-लर्निंग स्टुडन्ट अॅप आणि नाविन्यपूर्ण प्रोगात्मक अध्ययन उपाययोजना पुरविल्या जातील.