
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । मुंबई । होम इंटीरिअर सोल्यूशन आणि भारतातील पहिली मेड-टू-ऑर्डर फर्निचर उत्पादक कंपनी अरिवेने (Arrivae) शेल्टन सफायर, सेक्टर १५, बेलापूर, नवी मुंबई येथील आपल्या नवीन डिझाइन सेंटरचे आज उदघाटन केले. गुंतवणूकदारांच्या परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणा-या महिला प्रमुख, ग्राहक व विक्रेता सहयोगींकडून या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
या स्टोअरमध्ये अरिवेस्पेसेससाठी त्यांच्या ९ एक्सक्लुसिव्ह डिझाइन थीम्स दाखवणार आहे, ज्या इटलीमधील काही जागतिक अग्रणी डिझाइनर्सनी निर्माण केलेल्या डिझाइन्समधून प्रेरित आहेत. अरिवेचे स्टोअर लिव्हिंग रूम, मास्टर बेडरूम, किड्स बेडरूम, गेस्ट बेडरूम, मॉड्युलर किचन, डायनिंग एरिया व
मल्टीपरपज लाऊंज स्पेसचे मॉक-अप्स देत कार्यरत आहे. इंटीरिअर डिझाइन व फर्निचर उत्पादक अरिवे ग्राहकांना स्पेसेसचे लुक व फिल अनुभवण्याची, म्हणजेच साहित्याला स्पर्श करण्याची आणि नवोन्मेष्कारी डिझाइन सोल्यूशन्सच्या सोयीसुविधा अनुभवण्याची सुविधा देते. अशा सर्वोत्तम सुविधा ग्राहकांना त्यांच्या कुटुंबियांच्या विविध जीवन टप्प्यांना व्यापणा-या त्यांच्या स्वप्नवत घरांबाबत विचार करण्याचा अनुभव देतात.
डिझाइन सेंटरमधील व्यासपीठाची अंतर्गत डिझाइन टीम ग्राहकांना त्यांच्या होम डिझाइन-संबंधित चौकशींचे निराकरण करण्यामध्ये साह्य करते. ते त्यांच्या ड्रिम होम इंटीरिअर्सवर लक्ष्य केलेल्या डिझाइन-फ्री सल्लामसलत देखील देतात. हैदराबाद नंतर, सी.बी.डी. बेलापूर हे अरिवेच्या डिझाइन सेंटर यादीमधील नवीन गंतव्य आहे. अरिवेचे इतर डिझाइन सेंटर्स मुंबई, ठाणे, पुणे, गुरूग्राम, बेंगळुरू येथे असून इतर ठिकाणी देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
अरिवे ही ग्राहकांच्या अद्वितीय गरजा व आवश्यकतांची पूर्तता करणा-या सानुकूल डिझाइन्स देण्यासाठी २०१७ मध्ये स्थापना करण्यात आलेली भारतातील पहिली मेड-टू-ऑर्डर फर्निचर उत्पादक व होम इम्प्रूव्हमेंट सोल्यूशन प्रदाता कंपनी आहे.