ऑडिओ ब्रॅण्ड ट्रूकद्वारे मेक-इन-इंडिया उपक्रमाचा शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । मुंबई । ट्रूक या उच्‍च दर्जाची उत्पादने निर्माण करणा-या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑडिओ ब्रॅण्डने आज पुढील महिन्यापासून त्यांच्या सर्व उत्पादनांचे निर्माण भारतामधून सुरू होण्याची घोषणा केली. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा प्रचार करण्यासोबत चालना देण्याच्या प्रयत्नासह ट्रूक या उच्च दर्जाचे हेडफोन्स व हेडसेट्स निर्माण करण्याची दीर्घकालीन पंरपरा असलेल्या जर्मन ब्रॅण्डने आघाडीची स्वदेशी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लि.सोबत सहयोग करत आपली उत्पादन क्षमता अपवादात्मकरित्या वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे.

ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्ससोबत सहयोगाने ऑडिओ कंपनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावर्षी १ दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पुढील वर्षापर्यंत २०२३ मध्ये २० दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करून आपले उत्पादन वाढवण्याचा ट्रूकचा आणखी एक प्रयत्न आहे. बीटीजी, एस, फिट, एअरबड्स आणि क्यू सिरीज अंतर्गत अनेक टीडब्ल्यूएस उत्पादनांसह ट्रूकने भारतातील वेअरेबल अॅक्सेसरीज विभागात प्रबळ उपस्थिती निर्माण केली आहे.

ट्रूक इंडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, “मागील काही वर्षांमध्ये आम्ही आरअॅण्डडीमध्ये आमचे प्रयत्न समर्पित केले आहेत आणि ग्राहकांसाठी किफायतशीर दरांमध्ये आऊट-ऑफ-द-बॉक्स उत्पादने वितरित केली आहेत. प्रतिसाद उत्साहवर्धक राहिला आहे आणि आम्हाला देशातील अव्वल ऑडिओ ब्रॅण्ड्सपैकी एक बनण्यास मदत झाली आहे. आम्हाला भारतात उत्पादनासाठी आमच्या योजनेचा शुभारंभ करण्याचा आणि आमच्या उत्पादन क्षमता वाढवण्याच्या व भारताला लक्षणीय उत्पादन हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये आप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स लि. सोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्या मार्गात येणा-या प्रत्येक अडथळ्यावर मात करत राहू आणि भारतातील आघाडीचा साऊंडवेअर ब्रॅण्ड बनू, जो सर्व ग्राहकांना क्षमता, कार्यक्षमता व किफायतशीरपणाचे अद्वितीय संयोजन देईल.”


Back to top button
Don`t copy text!