दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । बारामती । क्रेडाई बारामती, क्रेडाई महाराष्ट्र व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती मध्ये १ मे कामगार व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘बांधकाम कामगार कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला त्याचा शुभारंभ मान्यरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अधिकारी श्री पोळ साहेब श्री बारवकर साहेब व श्री फडतरे साहेब उपस्थित होते. तसेच क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष राहुल खाटमोडे सचिव अमोल कावळे, सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये ४६० बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली व त्या कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच नोंदणीकृत कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये ४६० बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभापैकी सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तू संचाचे वाटप करण्यात आले. याबरोबरच काही कामगाराच्या मुलांसाठी शैक्षणिक लाभ व कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी मिळणाऱ्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या लाभांच्या योजनांची माहिती या कार्यक्रमांमध्ये देण्यात आली.