पेटीएमकडून कॅशबॅक पॉइण्ट्स ऑफर लाँच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । मुंबई । भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकी धारण करणारी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड देशभरातील लाखो युजर्सना सुरक्षित व सोईस्कर डिजिटल पेमेण्ट्स सुविधा देत आहे. कंपनीने जॅकपॉट ऑफरची घोषणा केली आहे, जेथे युजर्स त्यांच्या कॅशबॅक पॉइण्ट्सचा लाभ घेत आकर्षक रिवॉड्स जिंकू शकतात. पेटीएम युजर्स १०० कॅशबॅक पॉइण्ट्स खर्च करत जॅकपॉटमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि बंपर बक्षीस ६ लाख रूपयांची आकर्षक नवीन कार जिंकण्याची संधी मिळवू शकतात.

कॅशबॅक पॉइण्ट्स हा पेटीएम युजर्ससाठी विशेष रिवॉड्स प्रोग्राम आहे. पेटीएम अॅपच्या माध्यमातून पेमेण्ट्स केल्यास पैशाची भर, पैसे ट्रान्सफर, मोबाइल रिचार्ज केल्यानंतर किंवा त्यांची युटिलिटी बिले भरल्यानंतर युजर्स पॉइण्ट्स प्राप्त करू शकतात.

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, “आम्ही आमचे ग्राहक व व्यापारी भागीदारांना विनासायास सर्वोत्तम डिजिटल पेमेण्ट्स देण्याचा प्रयत्न करतो. जॅकपॉट ऑफरसह आम्ही अधिकाधिक युजर्सना त्यांचे कॅशबॅक पॉइण्ट्स रिडिम करत त्यामधून लाभ घेण्यास प्रेरित करण्याची आशा करतो.”

कॅशबॅक पॉइण्ट्स प्रोग्राम स्थिर गतीने विकसित होत आला आहे आणि आज युजर्स गिफ्ट वाऊचर्स मिळवण्यासाठी, आकर्षक डिल्स खरेदी करण्यासाठी आणि पेटीएम जॅकपॉटमध्ये सहभाग घेण्यासाठी पॉइण्ट्सचा वापर करू शकतात.

आज कंपनी विविध जॅकपॉट्स राबवत युजर्सना अनेक उत्साहवर्धक ग्रॅण्ड बक्षीसे देत आहे- जसे ६ लाख रूपयांची कार, आयफोन १३, ओप्पो स्मार्टफोन्स आणि झोमॅटो सबस्क्रिप्शन्स. बंपर बक्षीसाव्यतिरिक्त जॅकपॉटमधील प्रत्येक सहभागीला सहभागावर खात्रीदायी डिल मिळते. खात्रीदायी डिल्समध्ये झोमॅटो, ओप्पो, गाना, टाटा क्लिक यांसारख्या अव्वल ब्रॅण्ड्सच्या विशेष डिल्सचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!