माण पंचायत समितीच्या सभापती पदी रासपाच्या लतिका वीरकर बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, माण, दि.२६: माण पंचायत समितीच्या सभापती पदी रासपा च्या लतिका वीरकर बिनविरोध विजयी झाल्या. प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले, गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सांभाळली.

सभापति कविता जगदाळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी उपसभापती तानाजी कट्टे यांनी काम पाहिले. प्रभारी सभापती म्हणून दोन महिने तानाजी कट्टे यांना संधी मिळाली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार ही निवडणूक होत आहे. आज सकाळी 11 वाजता सभापती पदासाठी रा स प च्या उमेदवार लतिका वीरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला तानाजी काटकर यांनी सूचक म्हणून अनुमोदन दिले.

साडे अकरा वाजता छाननी झाली. विरोधी गटाचे विजयकुमार मगर गैरहजर राहिल्याने विरोधी गटाला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. राष्ट्रवादी व रासप युती या गटाकडे तीन सदस्य असून, आ जयकुमार गोरे गटाकडे तीन सदस्य आहेत. अनील देसाई गटाचे एक व शेखर गोरे गटाचे नितीन राजगे हे सदस्य फुटून या गटात सामील झाले आहेत.असे आठ सदस्य एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस शेखर गोरे गटाकडे दोन सदस्य आहेत. सद्य स्थितीत आठ विरूद्ध दोन असे बलाबल होते.परंतु ऐन निवडणुकीत शेखर गटाचे विजयकुमार मगर हे गैरहजर राहिले.त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.त्यामुळे लतिका वीरकर या बिनविरोध विजयी झाल्या.

रासप नेते बबन वीरकर यांनी आठ सदस्य एकत्र आणल्याने त्यांच्या पत्नी लतिका वीरकर यांना सभापती पद मिळाले. अविश्वास ठराव दाखल करण्यापासून हे सर्व सदस्य एकसंघ होते. लतिका वीरकर यांच्या बाजूने प्रभारी सभापती तानाजी कट्टे पाटील, माजी सभापती रमेश पाटोळे,नितीन राजगे,तानाजी काटकर, अपर्णा भोसले व चंद्रभागा आटपाडकर, रंजना जगदाळे या सदस्यांनी सहभाग नोंदवला. तर विरोधी गटाच्या कविता जगदाळे यांना त्यांचे सहकारी विजयकुमार मगर गैरहजर राहिल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर विजयकुमार मगर हे उपस्थित झाले.परंतु तोपर्यंत अर्ज दखल करण्याची मुदत संपली होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. लतिका वीरकर यांचे सर्व सदस्यांनी व रासप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!