स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात तिसऱ्या आयसीयु कक्षाचे व 5 ऑक्सीजन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण


 


स्थैर्य, सातारा दि१३: स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज तिसऱ्या आयसीयु बेड कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात आली. कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या या आयसीयुकक्षात 15 बेड असून याचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने 5 ऑक्सीजन मशीन या कक्षाला देण्यात आल्या आहेत, याचेही लोकार्पण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकूण 2 आयसीयु कक्ष आहेत आज तिसऱ्या आयसीयु कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कक्ष अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना उपचार मिळणार आहेत. 

आर्ट ऑफ लिव्हींगने ऑक्सीजन मशीन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आर्ट ऑफ लिव्हींगचे आभार त्यांनी मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या कक्षाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!