स्थैर्य, मुंबई, दि.३१: स्पॉट गोल्डने गेल्या आठवड्यात सकारात्मक संकेतांमुळे १.१ टक्क्यांची वाढ घेतली. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात वाढ आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अनुकूल भूमिका घेतल्याने डॉलर मजबूत स्थितीत आले. त्यामुळे सोन्याला आधार मिळाला. तसेच एप्रिल २०२१ मध्ये भरपूर मागणी वाढल्याने यूएस कंझ्यूमर दरांत वाढ झाली. त्यामुळे महागाईवर उतारा समजल्या जाणाऱ्या सोन्याला वाढत्या महागाईच्या पातळीमुळे पाठींबा मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्थांमधील सुधारणेच्या आशावादामुळे कच्चे तेल (डब्ल्यूटीआय क्रूड)च्या दरात ४ टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी दिसून आली. मात्र भारत आणि जपानसारख्या शीर्ष ग्राहकांकडून मागणीच प्रचंड घट झाल्याने चिंताही वाढल्या आहेत. अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांमधील महामारीसाठीचे निर्बंध कमी होत असल्याने तसेच जगभरात मोठ्या प्रमाणावरील लसीकरण महोमांमुळे तेलाच्या मागणीत सुधारणा दिसून आली. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकी क्रूड साठ्यात या आठवड्याच्या सुरुवातीला १.७ दशलक्ष बॅरलची घट झाल्याचे दर्शवले. त्यामुळे तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला असल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.
तसेच जागतिक बाजारात इराणी तेलाच्या प्रवेशामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील झालेल्या आण्विक करारातील घडामोडींवरही बाजाराचे लक्ष आहे. बाजारात इराणी तेल पुरवठा पुन्हा सुरु होण्यावरील लक्ष १ जून २०२१ रोजी होणाऱ्या ओपेकच्या बैठकीकडे वळण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात उत्पादनविषयक स्थिती या बैठकीत निश्चित केली जाईल.