शेवटच्या स्थायी समिती सभेमध्ये हद्दवाढीच्या भागातील कामांना मंजूरी – उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा नगरपरिषदेच्या शेवटच्या स्थायी समिती सभेमध्ये हद्दवाढ भागासह, शहरातील महत्वाच्या विविध कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून, लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत सातारा विकास आघाडीने गतीमान विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहीती सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य मनोज शेंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

याविषयी दिलेल्याप्रसिध्दीपत्रकात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी नमुद केले आहे की, सातारा नगरपरिषदेची सोमवार दि 14 रोजी बोलावलेल्या स्थायी समितीची सभा नगरपरिषदेच्या स्थायी समिती कक्षात पार पडली. या सभेत एकूण 400 विविध विकास कामांचे आणि नगरपरिषदेच्या प्रशासनाशी संबंधीत विषय निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. हे सर्व विषयी मंजूर करण्यात आले असून, निकडीच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. या आजच्या सभेत मंजूर झालेल्या विकास कामांबाबत शाहुपूरी, दरेखुर्द,शाहुनगर,विलासपूर, पिरवाडी,करंजे तर्फ या हद्दवाढ झालेल्या भागांतील आणि मुळ सातारा शहरातील निकडीच्या कामांचा समावेश आहे यामध्ये 15 संगणक संच खरेदी, आरसीसी गटर्स, रस्ते, उद्यान नुतनीकरण,स्ट्रीट लाईट, शहरातील चार ठिकाणी सेल्फी पॉईटस, स्व.दादामहाराज एकांकीका स्पर्धा आयोजनास मंजूरी देणे, या कामांसह पूर्वी मंजूर असलेल्या विकास कामांच्या निविदा मागविण्यात आल्या नंतरचे दर मंजूरीचे विषयांचा समावेश आहे.नागरिकांच्या लोकहितासाठी नगरपरिषदेने वेळोवेळी जरुर आवश्यक असणा-या सक्षम मंजूरीने कार्य क्षमपध्दतीने विविध विषय मार्गी लावेलेले आहेत. याचा लाभ अंतिमदृष्टया हद्दवाढ भागासह सातारा शहरातील नागरिकांना होणार आहे असेही मनोज शेंडे यांनी शेवटी नमुद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!