स्थैर्य, दि. १: पोस्ट खात्यामध्ये (India Post) मोठ्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ही भरती काढली आहे. यानुसार 2060 उमेदवारांती निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Odisha Postal Circle GDS Recruitment 2020: ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. या पदासाठी 10000 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. वय 18 ते 40 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे.
मुख्य तारखा….
१) ऑनलाईन अर्ज: 1 सप्टेंबरपासून नोदणीला सुरुवात,अंतिम दिनांक 30 सप्टेंबर राहणार आहे.
२) अर्ज शुल्क:सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एससी, एसटी वर्गातील महिला उमेदवारांना शुल्क नाही. हे शुल्क हेड पोस्ट ऑफिस किंवा नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे.
३)अर्ज कसा करावा:वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी www.appost.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. 10 वीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.