स्थैर्य, फलटण : लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली असून त्यानुसार फलटण आगारातून पुणे, बारामती, सातारा व लोणंद या ठिकाणी बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
फलटण आगारातून स्वारगेट (पुणे) स.6:30 वा., पुणे स्टेशन (पुणे) स.7:30 वा., सांगली स. 8, अक्कलकोट स.7.30, कोल्हापूर स. 8.30, लोणंद स.8.30, मुंबई स.11, मुंबई रात्री 10, बारामती स.6:30 वा. सातारा स.11:30 वा., लोणंद स.8 व 9:30 वा. असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 5 महिन्यांपासून एसटीची आंतरराज्य आणि राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी आंतरजिल्हा बससेवा 20 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.