मुंबईवरील 26-11 हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.३ : नवीन वर्षाच्या सुरुवातील एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी झाकी उर रहमान लखवी याला पाकिस्तानातून अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई हल्ल्याचा कट रचणे आणि त्याच्या अंमलबजावणीत हाफिज सईद याच्यासोबत झाकी उर रेहमान लखवी याचा हात होता. यापूर्वी आलेल्या माहितीनुसार मुंबईवर झालेल्या 26/11 या अतिरेकी हल्ल्याचा कट, आखणी आणि अंमलबजावणीत लखवी यांचा थेट सहभाग होता. 26/11 च्या हल्ल्यापूर्वी लखवीने डेव्हिड हेडलीला पुन्हा काम करण्यासाठी कसे राजी केले, मार्गदर्शन केले याविषयीही तपास सुरू झाला आहे. लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर लखवीला संयुक्त राष्ट्र संघाने मुंबई हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं.

मुंबई हल्ल्याच्या चौकशीदरम्यान हाफिस सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार करण्याचे काम लखवीने दिले होते. या हल्ल्यात, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 166 लोक ठार झाले, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. अनेक निरपराध लोकांच्या मृत्यूचा कट आखणा-या लखवीला सुमारे सहा वर्षांच्या कोठडीनंतर एप्रिल 2015 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!