काठियावाडी मेहतर रुखी समाजाच्या नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लखन डांगे यांची निवड

सर्वानुमते निवड प्रक्रिया संपन्न; उपाध्यक्षपदी विकी वाळा तर सचिवपदी विशाल मारुडा यांची नियुक्ती


स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : आगामी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी फलटण येथील काठियावाडी मेहतर रुखी समाजाच्या वतीने २०२५-२६ करिता ‘नवरात्र उत्सव समिती’ची निवड करण्यात आली आहे. महात्मा फुले नगर येथील छत्रपती शाहू महाराज समाज मंदिरात झालेल्या बैठकीत, लखन राजू डांगे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीत समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून विकी गणेश वाळा, तर सचिव म्हणून विशाल रमेश मारुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: लखन राजू डांगे
  • उपाध्यक्ष: विकी गणेश वाळा
  • सचिव: विशाल रमेश मारुडा
  • सहसचिव: विनोद रतिलाल मारुडा
  • कार्याध्यक्ष: गोपाळ रमेश वाघेला
  • खजिनदार: नयन हिरालाल वाळा
  • सहखजिनदार: अमन विजय वाळा
  • सल्लागार समिती: लाला सिद्धू डांगे, देवदास काना वाळा

या निवडीनंतर समाजातील ज्येष्ठ सदस्य राजू मारुडा, किरण डांगे, प्रकाश मारुडा, मनोज मारुडा, रमेश वाघेला, आनंद डांगे आणि रोहित मारुडा यांच्यासह उपस्थित सर्वांनी नूतन समितीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!