
स्थैर्य, सातारा, दि.15 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ शेख काका यांच्या पत्नी लैलाबी शेख (वय ८३ वर्ष ) यांचे आज दि. १५ मार्च रोजी सकाळी ७.00 वाजता अल्पशा आजाराने करंजे येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे 1 मुलगा, २ मुली , जावई , सून व नातवंडे असा परिवार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्रोत्तर काळात कॉ शेखकाकांनी केलेल्या अनेक चळवळींमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. उर्दू शाळेत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केले होते. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचे घर आपले घर वाटायचे.
आज संध्याकाळी ४.00 वाजता गेंडामाळ कब्रस्तान येथे दफन करण्यात येणार आहे