लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य आजही प्रेरणादायी : बिरजू मांढरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । बारामती । ब्रिटिशांच्या विरोधात लढून स्वातंत्र्य संग्रामात झोकून देऊन काम करून देश प्रेम ची शिकवण देणारे आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी केले. आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे पूजापाठ चा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी बिरजू मांढरे बोलत होते. यावेळेस मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हाध्यक्ष राजू भाऊसाहेब मांढरे तसेच रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील श्रावण शिंदे मातंग एडवोकेट अमृत नेटके एकता आंदोलन चे उपाध्यक्ष दिलीप शिंदे नगरसेवक बिरजू भाऊसाहेब मांढरे भाऊसाहेब घोलप शहराध्यक्ष मातंग एकता आंदोलन अंकुश मांढरे व किरण बोराडे विजय तेलंगे कृष्णा कांबळे कालिदास बल्लाळ मोहन सुतार सुरज कुचेकर अंकुश जाधव गोकुळ बल्लाळ सोमेश्वर सुतार रामभाऊ नवगिरे सागर सुतार
आदी मान्यवर उपस्तीत होते.

विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन भरारी मारत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांचे विचार विसरता कामा नये असेही बिरजू मांढरे यांनी केले. यावेळी आभार प्रदर्शन सचिन मांढरे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!