
दैनिक स्थैर्य | दि. 10 ऑगस्ट 2024 | फलटण | आगामी येणाऱ्या विधानसभेत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार करण्याचे काम विरोधक मुद्दाम करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुका समिती सदस्य तथा शिवसेना तालुकाध्यक्ष नानासो उर्फ पिंटू इवरे यांनी केला आहे.
याबाबत बोलताना इवरे म्हणाले की; लाडकी बहिण योजनेची एवढी भीती विरोधकांच्या मनात बसली आहे की; आता या योजनेचा अपप्रचार करण्याचे काम ते करत आहेत. सध्या लाडकी बहीण योजनेच्या आलेल्या अर्जांचे पडताळणीचे काम सुरू आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. आता सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये नवीन अपडेट येणार आहेत; वेबसाईट मध्ये अपडेट करण्याचे कामकाज सुरू आहे.