
थेट WhatsApp वर मिळवा
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २५ नोव्हेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ११ नोव्हेंबर : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. मात्र, आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत संभाव्य तारीख
दिवाळीच्या काळात दोन महिन्यांचा निधी एकत्र मिळेल अशी चर्चा होती, परंतु सरकारने केवळ सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले. त्यामुळे आता ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होऊन २५ नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारकडून अधिकृत घोषणा बाकी
ही कोणտीही अधिकृत तारीख नसून शासनाकडून याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये हप्ता न मिळाल्यास डिसेंबर महिन्यात दोन महिन्यांचा निधी एकत्र दिला जाणार का, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.





