लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचा दहावीचा निकाल 100%


दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। बारामती। येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 100% निकालाची घौडदौड कायम राखली आहे. विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागात सिद्धी धर्माधिकारी हिने 96.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अभिषेक सानप93.60% दुसरा, तर समीक्षा देवकाते 92.40% हिने तिसरा क्रमांक मिळवला.

इंग्रजी माध्यम विभागातून गौरी ढमे हिने 93.80%गुणांसह प्रथम क्रमांक, प्रणवराज गोलांडे (91%) दुसरा, तर रुतुजा पवार हिने 90.60% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. विद्यालयातील एकूण 11 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले असून, 63 विद्यार्थी 80% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. 75 हून अधिक विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये नीट, जे ई ई व सी ई टी परीक्षांची तयारी केली जाते असून, यंदा काही विद्यार्थी सरळ सरकारी एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र ठरले आहेत तसेच नीट व शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला आहे. सध्या 11 वीसाठी प्रवेश सुरू आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन नामदेव लडकत, संचालक प्रियांका लडकत, शुभांगी लडकत, गणेश लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, तानाजी गवळी आदींनी अभिनंदन केले. अनिल काशीद यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!