कुसुम यशवंत बगाडे यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि. ३ नोव्हेंबर : श्रीमती कुसुम यशवंत बगाडे (वय ९२, मूळ रा. वाई) यांचे दि. २ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एका संस्कारप्रिय व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला.

त्यांचे पती, मुलगा व नातू यांनी पोलीस दलात कर्तव्य बजावले आहे व बजावत आहेत.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. सावडणे विधी बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता संगम माहुली, सातारा येथे होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!