कुंडलिक रणवरे यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. १२ सप्टेंबर : तिरकवाडी हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य आणि कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कुंडलिक हरिभाऊ रणवरे (वय ७३, मूळ गाव – जिंती) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ते फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सचिन रणवरे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार, दि. 13 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोळकी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, अंत्यसंस्कार फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!