दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । फलटण । गोखळी ता. फलटण येथील कुणाल गावडे यांची नुकतीच सातारा जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. श्री.कुणाल गावडे हे एक उत्तम व आदर्श शिक्षक असून सध्या ते जिल्हा परिषद शाळा वाल्मिकवाडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत या अगोदर त्यांनी पाली जिल्हा रायगड येथे शिक्षक म्हणून उत्तम काम केले आहे.गेल्या दोन वर्षा पूर्वी ते रायगड जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने सातारा येथे आले आहेत. कुणाल गावडे हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने धडपडत असून शिक्षकांना न्याय मिळावा अशी आग्रही भूमिका ते मांडतात.ते उत्तम लेखकही आहेत त्यांच्या निवडीबद्दल समस्त शिक्षक बांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रहार संघटनेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू ,प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय महेशजी ठाकरे ,प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल लवटे सर, प्रहार शिक्षक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पडर,सातारा जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोरपडे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदिप धायगुडे,सल्लागार संजय लोखंडे पाटील, फलटण तालुकाध्यक्ष यशवंत जगताप व मित्रपरिवार यांनी कुणाल गावडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.