दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । बेळगाव येथे शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या वतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी दिनांक ३० मे ते ३ जून दरम्यान रोलर स्केटिंगचे आयोजन करण्यात आले होते. सदर लक्ष्य प्राप्त करण्यासाठी भारतातील ५७६ स्केटर आले होते. यात कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल मुंबई बांद्रा पूर्व येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक निखिल तांबे सर , प्रशिक्षक यश म्हात्रे सर तसेच स्केटर सिध्दीता सुर्वे, श्रवण गावडे, क्रिष्णा जयस्वाल, बाळकृष्ण घाडीगावकर आणि चिरायू गावडे यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांनी तब्बल ९६ तास स्केटिंग करत गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे.