
दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । पंढरपूर । २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कृष्णंम योग निसर्ग उपचार केंद्राच्या वतीने चंद्रभागा नदी पात्रातील वाळवंटात महिलांना एकत्रित करत योग दिन उत्साहात साजरा केला.
योग प्राणायमाचे महत्व महिलांना पटवून देण्यासाठी ही संस्था काम करते. योग दिनाचे औचित्य साधत महिलांना योग प्राणायमाचे महत्त्व त्याच बरोबर त्याचे फायदे आणि नियमित योगा केल्यानंतर शरीर तंदुरुस्त राहते याचे महत्त्व यावेळी महिलांना समजावून सांगण्यात आले.
दैनंदिन जीवनात महिलांना आपल्या घरातील कामे असतात, त्याच बरोबर कुंटुबाची जबाबदारी महिलांवर असते मग अशावेळी या महिला स्वत:आपल्या शरीराची काळजी घेत नाहीत. म्हणून आम्ही अश्याप्रकारे महिलांसाठी शिबिरांचे आयोजन करत असतो असं संस्थेच्या प्रमुख रिना अंकुशराव यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेविका समिती प्रमुख भक्ती नातू, सुवर्णा अंकुशराव, प्रिया पारसवार, वर्षा कांबळे, मोहिनी बळवंतराव, प्रिया कुलकर्णी, भारती पाटील, भारती म्हमाणे, अपर्णा टेंभूर्णीकर, मानसी बुचके, प्रिया मोतीवाले, आरती ढवलकर, अश्विनी अभंगराव, श्रुती अभंगराव, अर्चना विर्धे,रूपाली संगीतराव मंजिरी डोळे तेजस्विनी कुलकर्णी पुजा देशमुख आदी उपस्थित होते