
स्थैर्य, 2 फेब्रुवारी, सातारा : वाई येथील श्री कृष्णाबाई संस्थान घाट गणपती आळी ऊर्फ काशीविश्वेश्वर घाट यांचा कृष्णाबाई उत्सव सोमवारपासून (ता. 2) सुरू होत आहे. सात दिवस चालणार्या या उत्सवात विविध धार्मिक विधीबरोबरच भजन, कीर्तन, प्रवचन, भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता मंडप शुद्धीसाठी उदकशांत, दुपारी चार वाजता श्री. पाटणकर यांचे घरी हभप मंदारबुवा गाडगीळ यांचे कीर्तन व आरती, पाच वाजता मिरवणूक व स्थापना, सहा वाजता प्रसादाच्या साड्यांचे लिलाव, रात्री नऊ वाजता सर्व वेदशाखांचे मंत्रजागर होणार आहे.मंगळवारी (ता. 3) दुपारी तीन वाजता मुरलीधर भजनी मंडळ व चार वाजता गागों भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी सहा वाजता धनश्री लेले (मुंबई) यांचे ’करुणाष्टके चिंतन’ या विषयावर प्रवचन, रात्री साडेनऊवाजता हभप मोडकबुवा रायकर (डोंबिवली) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
बुधवारी (ता. 4) दुपारी तीन वाजता मैत्रेयी मंडळ यांचे श्रीसूक्त पठण, चार वाजता गार्गी भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी सहा वाजता धनश्री लेले (मुंबई) यांचे प्रवचन, रात्री साडेनऊ वाजता संशोधक व वक्ते आर्यमान लिमये व आदित्य गोखले हे ’सीता चरित्र’ अंतर्गत गीतरामायण व दृकश्राव्य माध्यमाद्वारे वाल्मीकी रामायणातील सीतेचे उत्कट जीवन दर्शन घडवणार आहेत. यामध्ये सानिका वाघ (गायिका), सानिका पिंगळे (संवादिनी), अथर् गंभीर (तबला) या कलाकारांचा समावेश आहे.
गुरुवारी (ता. 5) सकाळी दहा वाजता राष्ट्रसेविका समितीतर्फे श्रीसूक्त पठण, दुपारी अडीच वाजता समर्थ भजनी मंडळ (आनंदनगर, पुणे) यांचे भजन होणार आहे. सादरकर्त्या श्रीमती पद्मजा जोगळेकर आहेत. सायंकाळी सहा वाजता रुद्राक्ष वझे (बोरी पोंडागोवा) प्रस्तुत मर्म बंधातील ठेव ही हा नाट्यसंगीत, भक्ती संगीत व भावगीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायिका मुग्धा गावकर, गायक ऋषिकेश साने, रुद्राक्ष वझे (तबला), अनय घाटे (हार्मोनियम), केदार घामसकर (पखवाज), गोविंद गावठाणकर (मंजिरी) मानसी वाळवे (निवेदन) या कलाकारांचा सहभागआहे.
शुक्रवारी (ता. 6) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुक्तद्वार प्रसाद, त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता द ब्लू नोट गिटार अॅकॅडमी, सातारा प्रस्तुत ’भवतरंग’ हा अनोखा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता. 7) दुपारी तीन वाजता स्वरगंगा भजनी मंडळ (कन्हर्हाड) यांचे भजन, सायंकाळी सहा वाजता प्रसाद मेस्त्री (नेरूर सिंधुदुर्ग) प्रस्तुत ’नादब्रह्म’ हा भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायक गणेश मेस्त्री (सारेगमप व इंडियन आयडॉलचा मानकरी, मुंबई) व हर्षद मेस्त्री, तसेच अमित मेस्त्री (हार्मोनियम), प्रसाद मेस्त्री (तबला), आनंद मौर्य (पखवाज), प्रणव मेस्त्री (टाळ) व नीलेश गुरव(निवेदन) या कलाकारांचा समावेश आहे. रात्री दहा वाजता हभप चिन्मयबुवा देशपांडे (पुणे) यांचे लळिताचे कीर्तन होणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता आरती, मंत्रपुष्प व त्यानंतर श्रींची मिरवणूक व छबिना निघणार आहे. रात्री मंडप विसर्जन करण्यात येणार आहे.
याशिवाय दररोज सकाळी साडेसात वाजता लघुरुद्र, व रात्री आठ वाजता आरती मंत्रपुष्प, तसेच सकाळी 11 वाजता आळीतील महिलांचे स्तोत्र पठण होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ वैद्य यांनी दिली.

