कृष्णा खोरे ‘फ्लड डायवर्षण’ प्रोजेक्टला तत्वत: मान्यता – खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ जुलै २०२३ | फलटण |
मुंबई येथे झालेल्या बैठकीत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोरे ‘फ्लड डायवर्षण’ प्रोजेक्टला तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यानुसार या प्रोजेक्टच्या सर्व्हेक्षणाचे आदेश पारित करण्यात आले आहे. हा प्रोजेक्ट अंदाजे २० हजार कोटींचा आहे. या प्रोजेेक्टमुळे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल, अशी माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार आज माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले, चिफ इंजिनिअर गुनाले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.

पावसाळ्यामध्ये कोल्हापूर, सांगली व सातार्‍यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते, त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. या भागातील जनजीवनाचे, शेतकर्‍यांच्या पिकांचे आर्थिक नुकसान प्रचंड होत असते. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल, यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीची बैठक घेऊन आज फडणवीस यांनी प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. हा प्रकल्प अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणार्‍या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद आज करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. यामुळे माण-खटाव, फलटण, मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट आज फडणवीस यांनी दिली. भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल. तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!