कृष्णा कारखान्याचे 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. 29 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 2020-21 या आगामी गळीत हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये 2020-21 या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनजगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संजय पाटील, धोंडिराम जाधव, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरंपच मनोज पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.  भोसले म्हणाले, शासनाने 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगामास परवानगी दिली असून त्यादृष्टीने कृष्णा कारखान्यात ऑफ सिझनमधील ओव्हर ऑयलिंगची कामे गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचे करारही अंतिम टप्प्यात आले आहेत. येणार्‍या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असणार आहे. यासाठी सभासद शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या उसाची नोंद कृष्णा कारखान्याकडे करावी, असे आवाहन त्यांनी केले.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते धार्मिक विधी करून रोलरचे पूजन करण्यात आले. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, चिफ इंजिनिअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, असि. जनरल मॅनेजर डिस्टिलरी प्रतापसिंह नलवडे, को-जनरेशन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, लेबर अँड वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, इरिगेशन मॅनेजर आर. जे. पाटील, पर्चेस ऑफिसर रवींद्र देशमुख, कार्यालयीन अधीक्षक नीलेश देशमुख, स्टोअर किपर जी. बी. मोहिते उपस्थित होते. सोशल डिस्टन्िंसगचे पालन करत समारंभ पार पडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!