कृषिदूतांनी कोकण कृषी विद्यापीठाने निर्मित केलेल्या अ‍ॅप्सचा केला प्रसार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | माणगाव |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कोशिंबळे गावात ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, दापोली येथील निसर्गमित्र गटाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या अ‍ॅपसंबंधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे सरांच्या सूचनेनुसार शेतकर्‍यांमध्ये जनजागृती केली. या अ‍ॅपमध्ये विविध पिकांबद्दल म्हणजेच भात, काजू, आंबा, वनश्री, मत्स्यपालन यांबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये विविध शेतकर्‍यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दाखविला.

या प्रात्यक्षिकाचे आयोजन सौरभ शेडगे, सुमेध वाकले, अनिश जगताप, आकाश जाधव, प्रतीक चव्हाण, रिषभ मोरे, जीवन गोडसे, अनिकेत काजरेकर, पार्थ गुरसले, वैभव फुलसुंदर, लक्ष्मण माळगी यांनी केले होते.

यासाठी कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी सर, कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाधिकारी श्री. जीवन आरेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!