कृषी संजीवनी सप्ताहाचा पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 जुलै रोजी होणार कार्यक्रम


स्थैर्य, सातारा दि. 3 : कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलै या कालावधीत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे.  या सप्ताहाचा कार्यक्रम  सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे सकाळी 11.45 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण असणार आहे. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषद सदस्य, मंदाताई गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला आदी उपस्थित राहणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!