कृषी संजीवनी सप्ताह शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक : संजय साळुंखे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पिंपोडे बुद्रुक येथे  आंबा वृक्ष लागवड करतांना उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे, उपसरपंच अमोल, अशोक लेंभे, निकम, पी.एन.कोलवडकर, सचिन लेंभे व इतर

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि. ९ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने दि. १ ते ७ जुलै  या कालावधीत राबविण्यात येणारा “कृषि संजीवनी सप्ताह-२०२०” कार्यक्रमाचे औचित्य साधून शासनाच्या विविध योजना व केलेल्या कामाचा प्रक्षेत्र भेट शेतकरी शास्त्रज्ञ प्रशासन सुसंवाद हा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शकाची भूमिका बजावत असून शेतकऱ्यांसाठी निश्चित उपयुक्त व मार्गदर्शक असल्याचे  मत कोरेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे यांनी व्यक्त केले.

पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील  शेतकरी शशिकला लेंभे यांच्या शेतात आंबा फळबाग वृक्ष लागवड, अशोक लेंभे यांचा गांडूळ खत युनिट, व सिताफळ लागवड प्रक्षेत्र, मोहन जगताप डाळिंब व सीताफळ प्रक्षेत्र, चंद्रकांत गार्डी यांचा बीबीएफ पेरणी घेवडा व आले प्लॉट भेट व मार्गदर्शन बाबत सुसंवाद करुन या कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी संजय साळुंखे बोलत होते, कृषि विभागाचा कृषी संजीवनी सप्ताह परिसंवाद कौतूकास्पद असून कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने तालुक्यात केलेले काम नक्कीच कौतुकास्पद असून शेतीव्यवसाय व शेतकरी यांची गरज कोवीड १९ या महामारीच्या काळात स्पष्ट झालेली असून शेतकऱ्यांनी शासनाचे विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी. विशेषतः पिंपोडे बुद्रुक येथील कृषी विभागाचे कामकाज  कौतुक पात्र असून कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी असून सर्वानी त्याचा लाभ घेणेबाबत आवाहन साळुंखे यांनी केले. पं. स. माजी सदस्य अशोक लेंभे, सरपंच नैनेश कांबळे उपसरपंच अमोल निकम माजी सरपंच विकास साळुंखे, जनार्दन निकम, सुधीर साळुंखे, भावेनगर सरपंच गंगाराम पिसे, ग्रामपंचायत सदस्य धनसिंग साळुंखे, प्रमोद कदम, पांडुरंग मदने, सचिन लेंभे (सर) दिपक पिसाळ, तानाजी मदने, नारायण सावंत यासह कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कृषी सहाय्यक पी.एन. कोलवडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कृषी सहाय्यक चतुरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी व मान्यवरानी यांनी मोलाचे सहकार्य केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!