दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । धुमाळवाडी ता फलटण जिल्हा सातारा येथे १जुलै कृषि दिनाचे औचित्य साधून कृषि विभागा मार्फत कृषि संजीवनी सप्ताह मोहीम कार्यक्रमात यावेळी कीड व रोग नियंत्रण तज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव डॉ स्वाती गुरवे यांनी यावेळी पिक व फळपीका वरील कीड व रोग नियंत्रण बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले व फळपिकावरी कीड व रोगाचे नियंत्रण एकात्मिक पध्दतीने केल्यास फायदेशीर असल्याचे डॉ स्वाती गुरवे यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण कोळेकर यांनी २५ जून ते १जुलै कृषि संजीवनी सप्ताह मोहीम कार्यक्रम ७ दिवस मध्ये प्रत्येक दिवसी वेगवेगळ्या विषयाचे उपक्रम घेण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच फळबाग लागवड योजनेत सहभाग होणे बाबत तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उधोग योजनेत महिलांनी सहभागी व्हावेत तसेच कृषी विभागाच्या विविध योजने बद्दल माहिती देऊन योजनेत सहभागी होणे बाबत आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांनी केले. तसचे मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ यांनी कृषि दिन साजरा करण्याचे उद्देश व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली.
यावेळी कृषि पर्यवेक्षक योगेश भोंगळे यांनी माती परीक्षण महत्त्व व फायदे तसेच सेंद्रिय शेती व पिकास संतुलित खताचा वापर बाबत सविस्तरपणे माहिती दिली. यावेळी रुद्र नर्सरी लोणंद यांच्या मार्फत फळझाडाचे कलमे यांच्या वतीने देण्यात आले होते यावेळी १जुलै कृषि दिनाचे औचित्य साधून महिलाच सन्मान करण्यामागे उद्देश म्हणजे शेती क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभाग असतो तसेच कृषि क्षेत्रा महिलांचा सहभाग वाढवा यासाठी कृषि विभागा मार्फत विविध उपक्रम घेतले जातात कृषि तंत्रज्ञान अवलंब वाढविण्यासाठी व मनोबल व प्रेरणा वाढविण्यासाठी कृषि दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी महिला शेतकरी श्रीमती अनिता शिंदे गाव धुमाळवाडी यांचा मा उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांच्या हस्ते फळपिक आंबे कलमे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ५० महिला शेतकऱ्यांनचा नारळ आंबे, लिंबू , चिंच ,जांभूळ कलमे देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कीड व रोग तज्ञ कृषि विज्ञान केंद्र बोरगाव, डॉ स्वाती गुरवे , सरपंच पल्लवी पवार, मा मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ , कृषि पर्यवेक्षक विडणी योगश भोंगळे ,कृषि सहाय्यक सचिन जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी श्रीमती रुपाली हुंबे यांच्या शेताच्या बांधावर आंबा कलमे लागवड डॉ स्वाती गुरवे यांच्या हस्ते करण्यात आले
तसेच रुपाली हुंबे यांच्या डाळींब प्लॉट प्रक्षेत्र भेट देऊन डॉ स्वाती गुरवे यांनी शेतकऱयांनी विचारलेले प्रश्नाचे उत्तरे दिली
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन तसेच आभार सचिन जाधव कृषि सहाय्यक यांनी केले.