दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । गेल्या काही महिन्यापूर्वी सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली व रायगड जिल्ह्यमध्ये महापुराने थैमान घातलेले होते. त्यामध्ये अनेकांचे संसार देशोधडीला लागले. नदीकिनारच्या नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली. अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. सामाजिक जाणीव ठवून आता सुद्धा क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरग्रस्थांच्या घर बांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरघोस मदत करण्यात आलेली आहे. त्याबाबतचा धनादेश क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश इनामदार यांनी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे.
यावेळी बोलताना प्रकाश इनामदार म्हणाले कि, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिसूर्य प्रतिष्ठान कार्यरत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या हेतूने महापूरमध्ये ज्या नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली. अश्या नागरिकांना राज्य शाशनाच्या वतीने घरे बांधून देण्यात येणार आहे. म्हणूनच क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी काही निधी देण्यात आलेला आहे. त्याबाबतचा धनादेश हा फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे.