दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । फलटण । सध्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या राज्यामधून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी साधनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. आपण बाहेर जाताना मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचे वापर करणे गरजेचे आहे. हे जाणूनच क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या हस्ते फलटण येथे मास्क, सॅनिटायझर व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आलेले आहे.
या वेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, लोकमान्य उद्योग समूहाचे शिल्पकार डॉ. बी. के. यादव, नगरसेवक अजय माळावे, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे दादासाहेब चोरमले, पाक्षिक महामित्रचे संपादक दशरथ फुले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका कार्याध्यक्ष अमीर शेख, जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, नासिर शिकलगार, बाळासाहेब ननावरे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, बजरंग गावडे, नानासो ईवरे, राजेंद्र भागवत, समाजसेवक सोनवणे, चंद्रशेखर हेंद्रे, राजेश हेंद्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.