दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । फलटण । सध्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य गरीब नागरिकांना रक्त व लखवी तपासणे गरजेचे होते. परंतु आर्थिक परिस्तिथी मुळे रक्त व लखवी तपासणे शक्य होत नव्हते. हे जाणूनच क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या कल्पनेतून क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्वसामान्य गरीब नागरिकांचे मोफत रक्त व लखवी तपासणी करण्यात आली. ह्या मध्ये रक्त व लखवी तपासलेल्या नागरिकांनी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे व मिलिंद नेवसे यांचे विशेष आभार मानले. आगामी काळामध्ये क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्वसामान्य, गरीब व होतकरू नागरिकांना नेहमीच मदत करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी मिलिंद नेवसे यांनी दिली.
रक्त व लखवी तपासणी साठी फलटण येथील श्रद्धा लॅबचे शशिकांत मेनकुदळे यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रद्धा लॅबच्या वतीने शशिकांत मेनकुदळे यांनी सहकार्य केल्याबद्दल क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या वेळी प्रकाश इनामदार, अनिलकुमार शिंदे, पंढरीनाथ विलास कांबळे, सौ. शोभा विलास कांबळे, मनोज डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.