क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती फलटणमध्ये उत्साहात साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 04 जानेवारी 2024 | फलटण | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त फलटण येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर, आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र समता परिषदेचे शंकरराव लिंगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, दादासाहेव चोरमले, फलटण तालुका शिवसेनाप्रमुख नानासाहेब इवरे, शिवसेना (उद्धव ठाकरे) विकास नाळे, आयडियल स्कुलच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महात्मा फुले चौकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे आयोजित रक्तदान शिबिरास फुले प्रेमींनी उस्फुर्त हजेरी लावली होती. तब्बल 261 रक्तदात्यांनी रक्तदान करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले यासोबतच 240 जणांचे नेत्रतपासणी करण्यात आली आहे. फलटण शहरातील विविध शाळांमधील हजारो विध्यार्थी व विद्यार्थीनी अभिवादनासाठी हजेरी लावली होती. आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ढोलपथक लक्षवेधी ठरले होते.

अभिवादन करण्यासाठी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, कोळकीचे उपसरपंच विकास नाळे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष  जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले, समता परिषदेचे अध्यक्ष बापूराव शिंदे, क्षत्रिय माळी युवक संघटनेचे अध्यक्ष रणजीत भुजबळ, दीपक शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरदर कोल्हे, माळी महासंघाचे बाळासाहेब ननवरे, कोळकी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नाना नाळे, पाडेगाव विकास प्रतिष्ठानचे गिरीश बनकर, सनी रायकर, राहुल शिंदे, बंडू शिंदे, प्रवीण फरांदे, तुकाराम गायकवाड, विजय शिंदे, बापू राऊत, अमोल शिंदे, मयूर शिंदे, सिद्धेश भुजबळ, सुभाष अभंग, सुलेखा शिंदे, स्वाती जाधव, वृषाली शिंदे, माधुरी भुजबळ, सुजाता शिंदे, शितल घनवट, प्रज्ञा राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!