स्थैर्य, कोयनानगर, दि.२८: कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये डिसेंबरअखेर नौकाविहार प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी मानाईनगर येथील बोटिंग स्पॉटची पाहणी करून हा स्पॉट बोटिंगसाठी सुयोग्य असल्याचा अहवाल नुकताच दिला आहे.
शासनाने मार्च महिन्यांत कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये काही अटी व शर्थींचे पालन करून बोटिंग सुरू करायला परवानगी दिली असली, तरी बोटिंग स्पॉट अंतिम झालेला नसल्यामुळे परवानगी कागदावर तरंगत होती. याबाबत सकाळने सातत्याने पाठपूरावा सुरु ठेवला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा शिवसागर जलाशयातील बाेटींग बाबत हालचाली सुरु केल्या.
..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी काही दिवसांपुर्वी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाहणी करून नौकाविहारासाठी कोयना धरणाच्या भिंतीपासून सात किलोमीटरपुढे असणारा मानाईनगर येथील यमकर या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्पॉटची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हा स्पाॅट अंतिम केला आहे.
याबाबत श्री. शिंदे म्हणाले, “”पर्यटनातून स्थानिक विकास हे शासनाचे धोरण आहे. वन्यजीव विभागाने स्थानिक जनतेबरोबर समन्वय ठेऊन त्यांचे सहकार्य घेऊन विकास साधावा. सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर जो विकासाचा आराखडा वन विभागाने राबविला आहे त्याची अंमलबजावणी वन्यजीव विभागाने कोयनेत करावी, अशा सूचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत.”