स्थैर्य, सातारा, दि. 24 : जिल्ह्यात दोन दिवसात हाहाकार उडवणाऱ्या करोना ने जावली तालुक्यात ही खळबळ उडवली असून शनिवारी रात्री दुर्गम अशा बामणोली भागातील सावरी या छोट्याशा गावातील दोन जण करोना बाधित रुग्ण आढळल्याने कोयना भाग हादरला आहे.
१९ मे रोजी ठाणे येथून सावरी ता. जावली येथील एक कुटुंब रात्री गावी यायला निघाले. २० मे ला सकाळी ते सावरी गावी पोहचले. खाजगी वाहन व टू व्हीलर आदी वाहनातून १८ जण एकदम गावात आले. त्यातील दोन जनांना २२ मे पासून ताप व ईतर लक्षणे असल्याने त्यांनी जवळील बामणोली येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले. डाॅक्टरानी त्यांना करोना संशयीत म्हणून सायंकाळी सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे हलवले. शनिवारी रात्री त्यांचे अहवाल पाॅजिटिव्ह आले. दोन जण पाॅजिटिव्ह आल्याने रविवारी सकाळीच तालुका आरोग्य अधिकारी डाॅक्टर भगवान मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर ज्ञानेश्वर मोरे व डाॅक्टर माधुरी जगताप यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा गावात पोहचून माहिती संकलनाचे काम सुरू झाले. सदर कुटुंब गावातच होम क्वारंटाईन असल्याने ईतर कोणी थेट संपर्कातील नसल्याने मुंबई वरून आलेल्यापैकी थेट सहवासातील सोळा जण व त्यांच्या सोबत प्रवास करून आलेला मेढा भागातील एक युवक असे सतरा जणांना सोमवारी सकाळी वाई येथील रुग्णालयात दाखल करून त्यांचे स्वॅब घेण्यात येनार आहेत.
तर लो रिस्क काॅनटॅक्ट मधील गावातील आठ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी गावात दक्षता समिती ची मिटींग घेऊन त्यांना खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या. तर गावच्या वेशी बंद करून गाव सील करण्यात आले. वेशीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळील तेटली व म्हावशी गावे ही बफर झोण मधे असल्याने तेथेही रोज सर्व्हे करण्यात येणार आहे. जावलीत आतापर्यंत सापडलेले सर्वच रुग्ण हे मुंबई वरून प्रवास करून आलेले असल्याने मुंबईकरांनी जावलीकरांची वाढवली आहे.