
दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 14 रोजी कोविड योद्धा सन्मानं सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा सोहळा ठाणे येथे काशिनाथ नाटयगृह मानपाडा ठाणे ( पश्चिम ) येथे होणार आहे .
या कार्यक्रमाची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली . या सोहळ्यासाठी साताऱ्यातून शंभर शिवसैनिक जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
मोरे पुढे म्हणाले, ” वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन चा रविवारी दि 14 नोव्हेंबर रोजी चौथा वर्धापनदिन आहे . या सोहळ्यात राज्यातील निवडक कोविड योध्यांचा सन्मान केला जाणार आहे . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, वरूण सरदेसाई, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, अभिनेते मंगेश देसाई हे मान्यवर यावेळी उपस्थित होणार आहेत .
पहिल्या सत्रात वैद्यकीय मदत कक्ष वेबसाईट व मोबाइल अॅपचा उद्घाटन सोहळा होणार आहे . माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील, खासदार संजय राऊत, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, ठाणे महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, इं मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे . या सोहळ्यानंतर आरोग्य परिसंवाद होणार आहे . सिनेअभिनेते शरद पोंक्षे, ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ विजय सुरासे, हे मान्यवर मेळाव्याला मार्गदर्शनं करणार आहेत . ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत . या कार्यक्रमाला जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे .
या पत्रकार परिषदेला सातारा उपाजिल्हा समन्वयक दीपक चव्हाण, सातारा शहर समन्वयक सुमित नाईक व सातारा तालुका समन्वयक मंगेश जाधव उपस्थित होते.