आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगावात दुसरे शंभर बेड्‌सचे कोविड हॉस्पिटल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोरेगाव, दि.०५: कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देखील आमदार महेश शिंदे हे पुन्हा एकदा धन्वंतरीच्या रुपाने कार्यरत झाले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या १२२ बेड्‌सच्या काडसिध्द कोविड हॉस्पिटलनंतर आता वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन पुन्हा एकदा रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात नवीन शंभर बेड्‌सचे सुसज्ज आणि सर्वाधिक ९० ऑक्सिजन बेड्‌सचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. नजिकच्या काळात ते सुरु केले जाणार आहे.

मतदारसंघातील सर्व जनता आपल्याच कुटुंबातील घटक आहे, हा केंद्रबिंदू ठेवून त्यांनी कोरेगाव, खटावसह सातारा तालुक्यातील जनतेसाठी आमदार होण्यापूर्वीपासून काम करण्यास सुरुवात केली आहे. जनतेने मोठ्या विश्‍वासाने त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी जनतेच्या विश्‍वासाला तडा न जाऊ देता अभिनव पध्दतीने कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी स्वखर्चाने रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात काडसिध्द कोविड हॉस्पिटल उभे केले होते. राज्यात स्वखर्चाने पहिले सुसज्ज कोविड हॉस्पिटल अल्पावधीत उभारणारे ते पहिले आमदार आहेत. त्यांनी केवळ कोविड सेंटर उभारले नाही तर महानगरांमध्ये काम करत असलेले तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांचा ताफा कोरोनाबाधितांच्या सेवेत दाखल केला होता.

व्हेंटीलेटर बेड्‌सची संख्या अगदी नगण्य असल्याने त्यांनी आयसीयुसह व्हेंटीलेटर बेड्‌सची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ हजार ३० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करुन, त्यांच्यावर उपचार केले. त्याचबरोबर १४३० रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार करुन त्यांना विनाशुल्क सहीसलामत घरी परतले आहेत. मतदारसंघातील जे रुग्ण अत्यवस्थ होते, त्यांच्या उपचाराची व्यवस्था पुणे मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये आमदार महेश शिंदे यांनी केली होती.
कोरोना काळात कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांना नाष्टासह जेवणाची व्यवस्था देखील आमदार महेश शिंदे यांच्यामार्फतच करण्यात आली होती. तसेच कोरोना काळात व्यवसाय बंद राहिल्याने समाजातील सर्वच घटकांना आर्थिक व जीवनावश्यक साहित्यरुपी मदत देखील करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीषणता लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर काडसिध्द कोविड हॉस्पिटलची कमीत कमी कालावधीत उभारणी केली आहे. सद्यस्थितीत तेथे १२२ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून, तेथे ऑक्सिजनयुक्त बेड्‌सची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर परदेशातून आयात करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटरचा वापर केला जात आहे.
मतदारसंघातील तीन्ही तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असल्याने आमदार महेश शिंदे यांनी तातडीने पुन्हा एकदा रेल्वे स्टेशननजिक जितराज मंगल कार्यालयात नवीन शंभर बेड्‌सचे सुसज्ज आणि सर्वाधिक ऑक्सिजन बेड्‌सचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे काम दिवसरात्र युध्दपातळीवर सुरु आहे. शंभर बेड्‌सचे सुसज्ज आणि सर्वाधिक ९० ऑक्सिजन बेड्‌सचे कोविड हॉस्पिटल तयार केले जात असून, नजिकच्या काळात ते सुरु केले जाणार आहे.

कोरेगाव शहरातील सर्व रुग्णांसाठी मोफत जेवण
कोरेगाव शहरातील सर्वच खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील आता मोफत जेवण दिले जाणार असून, रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी संतोष (आबा) जाधव यांच्याशी मोबाईल क्र. ९२२४४३६६८८ अथवा ७५८८६३७५४५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लवकरच कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्याहस्ते आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच नवीन कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ होणार आहे.

सुसज्ज रुग्णवाहिकेमुळे वाचले शेकडो रुग्णांचे प्राण
आमदार महेश शिंदे यांनी पहिल्यापासून कोरोनाबाधितांसाठी काय काय करता येईल, याचा बारकाईने अभ्यास केला. जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कोरेगाव नगरपंचायतीसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेने कोरोनाच्या पहिल्या आणि आताच्या दुसर्‍या लाटेत शेकडो जणांचे प्राण वाचविले आहेत. एका फोन कॉलवर २४ तास कधीही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी हजर असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एकूणच सुसज्ज रुग्णवाहिकेमुळे शेकडोंचे प्राण वाचले आहेत


Back to top button
Don`t copy text!